काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

By: Khabre Aaj Bhi
May 26, 2021
165

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त गांधी भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी, माजी आ. मोहन जोशी, माजी आ. माणिकराव जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, इंटकचे जयप्रकाश छाजेड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील, देवानंद पवार, राजेश जाधव आदी उपस्थित होते.   


यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरपंच ते राज्याचा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री या प्रदीर्घ राजकीय प्रवासात विलासराव देशमुख साहेबांनी त्यांना मिळालेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. समाजकारण, राजकारण, सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. राजकारणापलिकडे त्यांचे सर्वांशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते. महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास हेच त्यांचे ध्येय होते. महाराष्ट्राला प्रगतीशील राज्य बनवण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. विलासराव देशमुख साहेबांची कारकीर्द आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा या महान लोकनेत्याला जयंतीदिनी विनम्र अभिवादन!


Khabre Aaj Bhi

Reporter - Khabre Aaj Bhi

Who will win IPL 2023 ?